
संगमनेर : आंबीखालसा फाटा (ता. संगमनेर) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सूचनेवरून घारगाव पोलिसांनी गुरुवारी (ता.८) पहाटे दीड वाजता कत्तलीच्या उद्देशाने सतरा गोवंश जनावरांची ट्रकमधून सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.