
राहुरी : देवळाली प्रवरा येथे एका आदिवासी महिलेच्या घरात घुसून सामानाची तोडफोड करण्यात आली. तसेच जातीवाचक शिवीगाळ, विनयभंग, मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात १९ जणांच्या विरोधात दरोडा, ॲट्रॉसिटी, पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.