
अहिल्यानगर : संततधार पावसामुळे जीर्ण इमारतींच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. महानगरपालिका प्रशासनाने १९७ इमारतींना नोटिसा बजावून १५ इमारती तत्काळ पाडण्याचे आदेश दिले आहेत. परंतु संबंधित इमारत मालकांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे दुर्दैवाने एखादी इमारत कोसळून जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल नगरकर उपस्थित करत आहेत.