दोन चंदनतस्कर जेरबंद; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sandalwood smugglers

दोन चंदनतस्कर जेरबंद; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर : इनोव्हा कारमधून चंदनाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन चंदनतस्करांना (Sandalwood smugglers) कोतवाली पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून 11 लाख 84 हजार रूपये किंमतीच्या 370 किलो चंदनाचे लाकडे, कार, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे 18 लाख 96 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कार चालक सुभाष भीमराज दिलवाले (वय 47) व राजेंद्र रंगनाथ सासवडे (वय 30, दोघे रा. चिचोंडी पाटील ता. नगर) अशी पकडलेल्या चंदनतस्करांची नावे आहेत.

पोलिस अंमलदार योगेश भिंगारदिवे यांनी फिर्याद दिली आहे. कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, शहरातील सैनिक लॉन गेट समोरील परिसरात दोन चंदन तस्कर येणार आहेत. कोतवालीच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी पोलिस अंमलदार योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, सलिम शेख, गणेश धोत्रे, संतोष गोमसाळे, अमोल गाडे, सोमनाथ राऊत, अभय कदम, अतुल काजळे यांनी पहाटे एक वाजल्यापासूनच चांदणी चौक ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सैनिक लॉन गेट समोरील परीसरात सापळा लावला. राखाडी रंगाची इनोव्हा कार (MH 12 JU 5644) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी थांबविली. कारची झडती घेतली असता प्लास्टीकच्या 17 गोण्यांमध्ये भरलेले 370 किलो चंदन लाकूड हाती लागले.

हेही वाचा: नाशिक : शेतातील गवताच्या गंजीला आग; एकाचा मृत्यू

बाजारभावानुसार त्याची किंमत 11 लाख 84 हजार रूपये आहे. पोलिसांनी कारसह चंदन, मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अंमलदार योगेश भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींच्या विरोधात चोरी, भारतीय वन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

हेही वाचा: मुलाने केला बापाचा खून; कंबरेला दगड बांधून प्रेत विहिरीत फेकले

Web Title: 2 Sandalwood Smugglers Arrested Ahmednagar News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AhmednagarCrime News
go to top