पारनेर तालुक्यात कोरोनाचे २ हजार रूग्ण

मार्तंड बुचुडे
Sunday, 18 October 2020

मागील महिन्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.28 टक्के आहे. कोरोना रूग्णांचा मृत्यू दर फक्त 1.76 टक्के आहे. तो अतिशय कमी आहे, ही समाधानाची बाब आहे. तसेच तालुक्यात 65.09 टक्के पुरूष तर महिला रूग्णांची संख्या 34.91 टक्के आहे. कोरोनारूग्णांमध्ये 20 ते 60या वयोगटातील रूग्णांची संख्या अधिक आहे.

पारनेर ः तालुक्यात गेली सुमारे सात महिन्यात काल (ता. 18) अखेर तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. काल अखेर तालुक्यातील रूग्ण संखेने दोनहजाराचा टप्पा पार केला आहे. दोन हजार पाच रूग्ण आढळून आले आहेत. त्या पैकी एक हजार आठशे 71 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. या आजाराने 34 जणांना मृत्यूने गाठले. सध्या 100 रूग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

तालुक्यात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कोरोनाचा जोर वाढतच गेला. या काळात रूग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत गेली. आता मात्र गेली आठ दिवसांपासून तालुक्यातील रूग्ण् संख्या झपाट्याने घटत असल्याने लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मागील महिन्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.28 टक्के आहे. कोरोना रूग्णांचा मृत्यू दर फक्त 1.76 टक्के आहे. तो अतिशय कमी आहे, ही समाधानाची बाब आहे. तसेच तालुक्यात 65.09 टक्के पुरूष तर महिला रूग्णांची संख्या 34.91 टक्के आहे. कोरोनारूग्णांमध्ये 20 ते 60या वयोगटातील रूग्णांची संख्या अधिक आहे.

80 वर्षांवरील व 20 वर्षा वयाच्या आतील रूग्णांची संख्या त्या मानाने कमी आहे. तरी सुद्धा या वयोगटातील लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
लॉकडाऊन शिथील होत आहे. आठवडे बाजारही सुरू झाले आहेत. जनजीवन मूळ पदावर येत आहे. मात्र, आगामी काळात अनेक सण उत्सवही येत आहेत. बाजारात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी लोकांनी स्वताःची व कुटुंबाची अधिक काळजी घेणे काळची गरज आहे

- डॉ. प्रकाश लाळगे, तालुका आरोग्य अधिकारी, पारनेर. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 thousand patients of corona in Parner taluka