पाथर्डी तालुक्यात २० जण कोरोनाबाधित; १३ जणांना सोडले घरी 

राजेंद्र सावंत
शनिवार, 11 जुलै 2020

पाथर्डी शहरातील मौलाना आझाद चौकातील एक महीला कोरोनाबाधीत झाली आहे. तिच्या घरातच २२ जण राहतात. तिच्या संपर्कातील २६ लोकांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले आहेत. शिक्षक काँलनीतील पोलिसांची पत्नी व रुग्णाच्या संपर्कातील इतरांचे आठजणांचे स्त्राव घेण्यात आले आहेत.

पाथर्डी (अहमदनगर) : पाथर्डी तालुक्यात २० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १३ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तिघेजण नगरच्या जिल्हा रुग्णालयात तर पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात चारजण कोरोनाबाधीत उपचार घेत आहेत. तिसगाव येथील एक खाजगी वैद्यकीय व्यवसायीकाला कोरोनाचीबाधा झाल्याने त्यांचा मिरी रस्त्यावरील दवाखाना बंद करण्यात आला आहे. पाथर्डीत लाँकडाऊन शिथील केले आणि रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाथर्डी शहरातील मौलाना आझाद चौकातील एक महीला कोरोनाबाधीत झाली आहे. तिच्या घरातच २२ जण राहतात. तिच्या संपर्कातील २६ लोकांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले आहेत. शिक्षक काँलनीतील पोलिसांची पत्नी व रुग्णाच्या संपर्कातील इतरांचे आठजणांचे स्त्राव घेण्यात आले आहेत. नाशिक येतुन आलेली पिपंळगावटप्पा येथील पोलिस युवतीच्या आई, वडील व भाऊ यांचे स्त्राव घेतले आहेत. सोनई येथील विवाह समारंभ कोल्हार येथे पार पडलेला आहे. सोनईचे तेराजण बाधीत निघाल्याने कोल्हार येथे विवाह समारंभात उपस्थीत असलेल्या बेचाळीस जणांचे स्त्राव घेतले आहेत.

नगर येथे कोरोनाबाधीत रुग्णांना ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात कोवीड उपचार सेंटर सुरु करण्यात आले आहे. तेथे चार कोरोनाबाधीत उपचार घेत आहेत. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक कराळे व इतर वैद्यकीय अधिकारी कोरोना बाधीतांवर उपचार करीत आहेत. तहसिलदार नामदेव पाटील व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान दराडे हे बाधीत झालेल्या रुग्णांचे संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यासाठी निर्णय घेवुन सहका-याकडुन काम करुन घेत आहेत.

तिसगावच्या वैद्यकीय व्यवसायीकाच्या दवाखान्यातील अन्य डॉक्टर, आरोग्य सोविका, मदतनीस, कर्मचारी व तेथे उपचार घेणारे रुग्ण, गेल्या तिन दिवसात उपचार घेतलेल्या रुग्ण अशा सर्वांची चौकशी सुरु असुन त्यांचे स्त्राव घेण्यात येत आहेत. पिपंळगाव टप्पा येथील महीला पोलिस , आगसखांड (पुणे येथुन आलेले तिघे), मौलाना आझाद चौकातील एक महीला (पाथर्डी), शिक्षक काँलनीतील पोलिस, तिसगावचा वैद्यकीय व्यावसायीक असे सातजण कोरोनाबाधीत उपचार घेत आहेत. चौकट- तिसगावच्या मिरी रस्त्यावरील दवाखान्याला भेट देवुन तो बंद करण्याचे आदेश तहसिलदार नामदेव पाटील व तालुकाआरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी दिले आहेत. डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा तपास घेण्याचे काम सुरु आहे. त्यांची तपासणी करावी लागणार आहे.  

संपादन - अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 corona affected in Pathardi taluka, 13 people were released