
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या कार्यक्रम परिशिष्टानुसार येथील तालुका सेवा समिती आणि येथील वकील संघाच्या वतीने झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालय नुकतेच पार पडले.
श्रीरामपूर (अहमदनगर) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या कार्यक्रम परिशिष्टानुसार येथील तालुका सेवा समिती आणि येथील वकील संघाच्या वतीने झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालय नुकतेच पार पडले. येथील लोकन्यायालयात एक कोटी ६९ लाख रुपये रकमेची सुमारे २०० प्रकरणे तडजोडीनंतर निकाली काढण्यात आली आहे.
तालुका सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम.एन.सलीम यांच्या हस्ते लोकन्यायालयाचे उदघाटन करण्यात आले होते. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी त्यात दिवाणी आणि फौजदारी तसेच मोटार अपघात प्रकरणे न्यायालयासमोर ठेवली होती. तसेच बँका, फायनान्स कंपन्यांची दावा दाखलपूर्व प्रकरणे असे एकुण दोन हजार ९०४ प्रकरणे निवाड्यासाठी न्यायालयासमोर ठेवली होती.
त्यातील २०० प्रकरणे निकाली लागले आहे. लोकन्यायालयात वकील संघाचे अध्यक्ष अँड. के. डी. रोकडे त्यांच्यासह पदाधिकारी आणि सर्व सदस्यासह संबंधित बँका, फायनान्स कंपन्या, भारत संचार निगम लिमिटेड, राज्य विद्युत मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने राष्ट्रीय लोकअदालत उपक्रमास नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात एकुण एक कोटी ६९ लाख रुपये रकमेची २०० प्रकरणे तडजोडीने निकाली काढली आहे.
संपादन : अशोक मुरुमकर