जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकिय दवाखान्यासाठी 21 काऊ लिफ्टिंग मशीन

आनंद गायकवाड
Thursday, 10 December 2020

21 पशुवैद्यकीय दवाखांन्यासाठी काऊ लिफ्टिंग मशीनचे वितरण जिल्हा परिषद व पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आज करण्यात आले.

संगमनेर : नगर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून संगमनेर तालुक्यातील गो पालकांसाठी गर्भावस्थेत असलेल्या गाईंना अडचणीच्या काळात उचलून उपचार करण्यासाठी, तालुक्यातील 21 पशुवैद्यकीय दवाखांन्यासाठी काऊ लिफ्टिंग मशीनचे वितरण जिल्हा परिषद व पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आज करण्यात आले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात दूग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात संकरित गाई पाळल्या जातात. या गाईंना गर्भावस्थेत कॅल्शियम कमी पडल्यास, अर्धांगवायू सदृष्य विकारामुळे गाई खाली बसतात. अशा वेळी त्यांच्यावर वैद्यकिय उपचार करण्यासाठी त्यांना उभे करण्यासाठी या मानवचलीत यंत्राचा उपयोग केला जातो. तालुक्यातील पशुवैद्यकिय दवाखान्यात या यंत्राची उपलब्धता नसल्याने, तत्कालिन पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे यांनी जिल्हा परिषद सेस फंडातून यंत्रांची मागणी केली होती.

जिल्हा परिषद सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे ही मागणी पूर्ण झाली आहे. थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, अजय फटांगरे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, रामहरी कातोरे आदींच्या उपस्थितीत या मशिनचे वितरण करण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती मिरा शेटे, नवनाथ आरगडे, सिताराम राऊत, मिलिंद कानवडे, शांताबाई खैरे, विष्णुपंत रहाटळ, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पोखरकर आदी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 21 cow lifting machines for Nagar Zilla Parishad Veterinary Dispensary