जिल्ह्यातील हिडफि-यांना 21 लाखांचा दंड 

corona 19
corona 19
Updated on

नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, चेहऱ्याला मास्क न लावणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश महाभाग सार्वजनिक ठिकाणी थुंकताना प्रशासनाच्या निदर्शनास आले, तर काही जण चेहऱ्याला मास्क न लावता भटकताना दिसत आहेत. अशाप्रकारे बेपर्वाईने वागणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत मागील अडीच महिन्यांत जिल्ह्यातील सहा हजार 751 जणांकडून तब्बल 21 लाख 33 हजार 550 रुपये दंड वसूल केला आहे. 

जिल्ह्यात 12 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाला लगाम लावण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत. स्वच्छतेबाबत दक्षता, सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन करण्यात आले. विनाकारण घराबाहेर पडणे, गर्दी करणे यास मनाई आहे. याच अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासही मनाई असून, चेहऱ्यावर मास्क लावणेही बंधनकारक आहे. या नियमांची अंमलबजावणी मागील 83 दिवसांपासून जिल्ह्यातील नगरपालिका प्रशासनाद्वारे सुरू आहे.

आजअखेर सहा हजार 751 जणांवर कारवाई करण्यात आली. मास्क न वापरल्याबद्दल पाच हजार 106 जणांकडून 18 लाख 25 हजार 630 रुपयांचा, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल एक हजार 645 जणांकडून तीन लाख सात हजार 920 रुपये दंड वसूल करण्यात आला. संगमनेर नगरपालिकेकडून सर्वाधिक म्हणजे तीन लाख 36 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

नगरपालिकानिहाय दंडवसुली 
श्रीरामपूर-1,74,200 
संगमनेर-3,41,000 
कोपरगाव-1,44,750 
राहुरी-1,42,350 
देवळाली प्रवरा-64,000 
राहाता-77,050 
पाथर्डी-1,50,500 
श्रीगोंदे-2,88,900 
शेवगाव-1,77,750 
जामखेड-1,27,900 
शिर्डी-1,16,550 
अकोले 70,200 
कर्जत-81,800 
पारनेर-1,12,600 
नेवासे-64,000 


कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. सोशल डिस्टन्सिंग राखणे, मास्क वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे हे उपाय कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वाचे आहेत. जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, हाच दंडात्मक कारवाईमागचा हेतू आहे. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Karjat Sets an Example of Humanity as Volunteers Stand by Their Sick Companion
Parents Trust the School, Infrastructure Fails the Students in Akole
Compassion in Action: Hingani Dumala Villagers Support Family After Tragic Loss
Anna Hazare’s Protest Averted as Maharashtra Govt Stays New RTI Rules
Marathi News Esakal
www.esakal.com