

Crop Damage Across 300 Villages; ₹25 Crore Compensation Sought
sakal
अहिल्यानगर: जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाचा ३०० गावांना फटका बसला. या बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मृत व्यक्ती, शेती पिकांचे नुकसान झालेले शेतकरी आणि मालमत्ता बाधित कुटुंबांसाठी २५ कोटी २० लाख रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने नाशिक विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.