डोळ्यासमोर शेतात जळाले २५ लाखाचे सोनं

विनायक दरंदले
Monday, 2 November 2020

गणेशवाडी (ता. नेवासे) येथील खरवंडी पश्चिम शिवारात शेतातून गेलेल्या वीज प्रवाहातील थिनगी ऊसाच्या शेतात पडल्याने परीसरातील तब्बल ४५ एकर क्षेत्राला आग लागून अंदाजे २५ लाखाचे नुकसान झाले आहे.

सोनई (अहमदनगर) : गणेशवाडी (ता. नेवासे) येथील खरवंडी पश्चिम शिवारात शेतातून गेलेल्या वीज प्रवाहातील थिनगी ऊसाच्या शेतात पडल्याने परीसरातील तब्बल ४५ एकर क्षेत्राला आग लागून अंदाजे २५ लाखाचे नुकसान झाले आहे.

शनिशिंगणापुर वीज उपकेंद्रातून गणेशवाडी व खरवंडीसाठी असलेल्या विद्युत वाहिन्यांची मोठी दुरावस्था आहे. याबाबत अनेकदा तक्रार करुनही दुर्लक्ष केल्याने रविवारी (ता. १) हरिभाऊ काकडे, राधाकिसन गिते, दीपक शामराव दरंदले, दामोधर काळे, विजय दरंदले, नरेंद्र तांदळे, सुभाष तांदळे, अदिनाथ तांदळे या शेतकऱ्यांच्या पंचेचाळीस एकर ऊसाला आग लागून मोठे नुकसान झाले आहे.

जळीत झालेल्या ऊसाच्या क्षेत्रापर्यत रस्ता नसल्याने अग्निशमन बंब पोचू शकला नाही. 
संजय भोगे, दत्ता बेल्हेकर, संजय लोहकरे, दत्तात्रेय कारभारी लोहकरे, संजय गडाखसह ग्रामस्थांनी मोठे धाडस दाखवून आग आटोक्यात आणली. या जळीतामध्ये ठिबक सिंचन संचासह शेतातील जलवाहिन्या व शेती उपयुक्त साहित्याचे नुकसान झाले आहे. मुळा कारखान्याच्या शेतकी विभागासह वीज मंडळ विभागाने आज दुपारी भेट देवून पाहणी केली.

जास्त पावसाने खरीप पीक हातचे गेले. आता ऊसपीकाचा आधार शेतकऱ्यांना होता. या नुकसानीचा २४ तासानंतरही पंचनामा झालेला नाही. वीज मंडळाच्या चुकीने हे नुकसान झाले आहे.
- कैलास दरंदले, सरपंच, गणेशवाडी 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 lakh loss due to burning of 45 acres of sugarcane in Ganeshwadi in Nevasa taluka