
-महेश माळवे
श्रीरामपूर: देवगाव शनीच्या (ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अडीचशे एकरांवर गोदातीरी बुधवारपासून (ता. ३०) भक्तीचा महासागर उसळणार आहे. योगीराज गंगागिरी महाराजांचा १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह, संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या सहदेह वैकुंठगमनाचा महोत्सव या तीन संतप्रेरित घटनांचा एकत्र योग साधला गेल्याने यंदाचा सप्ताह हा ‘त्रिसंत सुवर्णयोग’ ठरणार आहे.