नगर शहर, संगमनेर कोरोनाचे कुरण, आज २६जणांना बाधा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील १३, नगर शहर ०८, कोपरगाव तालुका ०२,अकोले ०२ आणि बीड जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. 

नगर ः कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले आहे. नगर शहराच्या चोहोबाजूने कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. दररोज २५ ते ३० रूग्ण बाधित आढळून येत आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील १३, नगर शहर ०८, कोपरगाव तालुका ०२,अकोले ०२ आणि बीड जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. 

हेही वाचा - नगरमध्ये एका लोकप्रतिनिधीला कोरोनाची लागण

आज दुपारी हे अहवाल जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाले. यामध्ये नगर शहरातील ८ रुग्णांसह कोपरगाव तालुक्यातील कारंजा चौक, येसगाव आणि धारणगाव दवंडे मामा वस्ती येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले.

अकोले शहरात ०२, संगमनेर तालुक्यातील कुरण येथे ०८, संगमनेर खुर्द येथे ०१, घुलेवाडी येथे ०१, संगमनेर शहरातील रहेमत नगर, विठ्ठलनगर,श्रमिकनगर येथेही प्रत्येकी एक रुग्ण आढळला.

याशिवाय, बीड जिल्ह्यातील कारखेल (ता. आष्टी) येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. नगर शहरातील गवळी वाडा, पाइप लाइन, हडको, ढवण वस्ती, चितळे रोड येथे रुग्ण आढळून आले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 patients infected with corona in Ahmednagar