Ahilyanagar Fraud: एजन्सीच्या आमिषाने ३० लाखांची फसवणूक; दोघांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Big Fraud in Name of Business Agency: तोफखाना पोलिस ठाण्यात ऑचल पवनकुमार अग्रवाल (वय २४, रा. तांबटकर मळा, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या कुटुंबाचा एमआयडीसीमध्ये श्रीराम इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. त्यांनी कुटुंबीयांसाठी अनुज अनिल मित्तल यांच्या विमानाचे तिकीट बुक केले होते.
"Agency promise turns into ₹30 lakh fraud — Duo booked by Topkhana Police in major cheating case.Sakal
अहिल्यानगर : विमान तिकीट बुकिंग एजन्सी देण्याचे आमिष दाखवून ३० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. आरोपी राहुल दर्शन जगताप आणि एंजल राहुल जगताप (सानपाडा, नवी मुंबई) या दोघांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.