esakal | नगरमध्ये ३०३ कोरोनाबाधित रूग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

303 corona patients in Ahmednagar

अहवालनुसार बाधित आढळून आलेल्या २७ रुग्णांमध्ये नगर शहरातील २५, नेवासा येथील आणि संगमनेर येथील एक रुग्ण आढळून आला होता.

नगरमध्ये ३०३ कोरोनाबाधित रूग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यात आज सकाळी ६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६३४ इतकी झाली आहे. चाचण्यांची संख्या वाढवून  बाधित आढळलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.

दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २७ जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले. त्याचबरोबर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या २३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.

हेही वाचा - कोरोनामुळे नगरच्या व्यापाऱ्याचा मृत्यू

त्यामुळे आज दुपारपर्यंत जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३०३ झाली अाहे. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ९५७ इतकी झाली आहे. आजच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे.

जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत 
केलेल्या चाचणीत शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालनुसार बाधित आढळून आलेल्या २७ रुग्णांमध्ये नगर शहरातील २५, नेवासा येथील आणि संगमनेर येथील एक रुग्ण आढळून आला होता.

कोरोनाचा प्रादूर्भाव गतिमान झाला आहे. प्रत्येक तालुक्यात रूग्ण सापडत आहे. वाढलेले लग्न सोहळे, खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने हे रूग्ण वाढत आहेत. रोज पाच-दहाच्या संख्येने येणारे रूग्ण नोंदी आता शंभरच्या घरात गेल्या आहेत.

संपादन - अशोक निंबाळकर