
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात शाळा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे
नगर ः राज्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यामुळे सरकारने शाळा व महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली. यामध्ये पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
जिल्ह्यातील 1209 पेक्षा 600 शाळा सुरू झालेल्या असून सध्या 32 हजार 139 विद्यार्थी धडे गिरवित आहेत.
जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या एक हजार 209 शाळा असून त्यामध्ये 16 हजार 706 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्ह्यात दोन लाख 84 हजार 354 विद्यार्थी शिक्षण घेतात.
हेही वाचा - श्रीरामपुरात दीड हजार जणांना मिळणार कोरोना लस
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात शाळा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाच्या निर्देशानुसार शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 15 हजार 147 शिक्षकांची तपासणी झाली असून त्यातील 159 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
अद्याप सुमारे एक हजार शिक्षकांच्या तपासण्या बाकी असून ती प्रक्रिया सुरू आहे. शासनाच्या निर्देशांचे पालन करून जिल्ह्यातील 600 शाळा सुरू झालेल्या असून त्यामध्ये 32 हजार 139 विद्यार्थी शाळेत येऊन शिक्षणाचे धडे घेत आहेत.