
-विलास कुलकर्णी
राहुरी : राहुरीची लघू औद्योगिक वसाहत तब्बल ३५ वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. पाणी नाही म्हणून उद्योग नाहीत आणि उद्योग नाहीत म्हणून पाणी नाही, अशी वसाहतीची अवस्था आहे. मुळा धरण अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर आहे. परंतु धरण उशाला, कोरड घशाला, अशी औद्योगिक वसाहतीची परिस्थिती आहे. त्यामुळे राहुरीच्या लघू औद्योगिक वसाहतीचा विकास खुंटला आहे.