
अहिल्यानगर : राज्यात स्तन कर्करोगाचा वाढता विळखा असून, राज्याच्या आरोग्य विभागाने केलेल्या चाचण्यांमधून रुग्णांची ओळख पटवण्यात मदत होत आहे. २०२४-२५ या वर्षात राज्यात दररोज तीन महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.