esakal | नगरमध्ये झाले ३६ हजार कोरोना रूग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

36,000 corona patients in Ahmednagar

खासगी प्रयोगशाळेत 222 बाधित आढळले. नगर शहरातील 62, संगमनेर 12, राहाता 16, पाथर्डी 11, नगर ग्रामीण 14, श्रीरामपूर 14, नेवासे 13, श्रीगोंदे चार, पारनेर 12, अकोले चार, राहुरी 37, शेवगाव तीन, कोपरगाव तीन, जामखेड 16 व कर्जतमधील एका रुग्णाचा समावेश आहे

नगरमध्ये झाले ३६ हजार कोरोना रूग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यात आज तब्बल 1055 रुग्णांना "डिस्चार्ज' देण्यात आला. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 31 हजार 191 झाली. दिवसभरात 703 बाधितांची भर पडली. त्यामुळे बाधितांची संख्या 36 हजार 115 झाली. सध्या 4338 रुग्ण उपचार घेत आहेत. 

जिल्हा रुग्णालयाच्या तपासणीत 111, खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत 222, अँटीजेन चाचणीत 370 बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या तपासणीत नगर शहरात 48, संगमनेर तीन, नगर ग्रामीण 12, श्रीरामपूर एक, भिंगार चार, नेवासे दोन, श्रीगोंदे 10, पारनेर एक, अकोले एक, राहुरी चार, शेवगाव 20, जामखेड तीन व सैनिकी हॉस्पिटलमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. 

खासगी प्रयोगशाळेत 222 बाधित आढळले. नगर शहरातील 62, संगमनेर 12, राहाता 16, पाथर्डी 11, नगर ग्रामीण 14, श्रीरामपूर 14, नेवासे 13, श्रीगोंदे चार, पारनेर 12, अकोले चार, राहुरी 37, शेवगाव तीन, कोपरगाव तीन, जामखेड 16 व कर्जतमधील एका रुग्णाचा समावेश आहे. 

अँटीजेन चाचणीत 370 बाधित सापडले. त्यात नगर शहरातील 19, संगमनेर 19, राहाता 55, पाथर्डी 36, नगर ग्रामीण 30, श्रीरामपूर 12, नेवासे 17, श्रीगोंदे पाच, पारनेर 16, अकोले 41, राहुरी 32, शेवगाव एक, कोपरगाव 39, जामखेड 31 व कर्जतमधील 17 रुग्णांचा समावेश आहे.