
Pune-Ahmednagar Highway Accident : शनिशिंगणापूरहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ४ ठार तर ११ जण जखमी
अहमदनगर : गुढी पाडव्याच्या दिवशी देवदर्शनानंतर घरी परतणाऱ्या भाविकांचा अहमदनगर-पुणे महामार्गावर नगर तालुक्यात कामरगाव शिवारात भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून तर ११ जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे भाविक पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आहेत . हे सर्व भाविक अहमदनगर जिल्ह्यात शनिशिंगणापूर आणि देवगड येथे देवदर्शन घेऊन ते गावी परतत होते.
शिरूर तालुक्यातील आमदाबाद आणि चिंचोली मोर या गावातील आहेत. दरम्यान नगर-पुणे महामार्गावर कामगारगावजवळ पुण्याकडून येणाऱ्या ट्रकने हे १६ जण प्रवास करत असलेल्या टेम्पोला धडक दिली. यामध्ये राजेंद्र साळवे, विजय अवचिते, धीरज मोहिते, मयूर साळवे यांचा मृत्यू झाला. जखमींना नगर शहरातील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
हेही वाचा - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!