esakal | कोपरगाव कारागृहातील ४२ कैद्यांना कोरोनाची बाधा
sakal

बोलून बातमी शोधा

42 inmates of Kopargaon jail corona positive

काल दिवसभरात तालुक्‍यातील 199 जणांना कोरोनाची लागण झाली. दिवसेंदिवस हा आकडा वाढत असून, लॉकडाउन केले तरी फारसा परिणाम दिसून आला नाही.

कोपरगाव कारागृहातील ४२ कैद्यांना कोरोनाची बाधा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव ःतालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरतील दुय्यम कारागृहातील तब्बल 42 कैद्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे तुरुंग प्रशासन हैराण झाले आहे. 

काल दिवसभरात तालुक्‍यातील 199 जणांना कोरोनाची लागण झाली. दिवसेंदिवस हा आकडा वाढत असून, लॉकडाउन केले तरी फारसा परिणाम दिसून आला नाही.

रॅपिड टेस्टमध्ये 81, नगर येथील अहवालात 94, तर खासगी प्रयोग शाळेत तपासणी केलेल्या 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. 

तुरुंगातील 80 टक्के कैदी बाधित झाल्याने इतर कैद्यांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची माहिती तुरुंग प्रशासनाने दिली आहे. तालुक्‍यात लॉकडाउन झाले. मात्र त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याने रस्त्यावर गर्दी दिसून येत आहे. 

loading image