नगर जिल्ह्यात ४७५ रूग्णांची कोरोनावर मात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

जिल्हा रुग्णालयातील तपासणी अहवालात 93 बाधित आढळले. त्यात महापालिका हद्दीत 41, अकोले 17, जामखेड चार, कर्जत दोन, नगर ग्रामीण एक, नेवासे 12, पारनेर चार, राहुरी तीन, संगमनेर दोन, शेवगाव तीन, श्रीरामपूरमध्ये दोन रुग्ण आहेत. 

नगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात 475 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आजअखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 49 हजार 712 झाली. रुग्ण बरे होण्याचा टक्का 94.10 आहे. 

मागील महिन्याच्या तुलनेत सध्या कोरोनाबाधित सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा आकडा पाचशेच्या आत आला आहे. रुग्णसंख्या कमी झाली असली, तरी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मागील चोवीस तासांत फक्त 385 कोरोनाबाधित आढळून आले. आजअखेर बाधितांची संख्या 52 हजार 827 झाली असून, त्यातील 803 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2212 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्हा रुग्णालयातील तपासणी अहवालात 93 बाधित आढळले. त्यात महापालिका हद्दीत 41, अकोले 17, जामखेड चार, कर्जत दोन, नगर ग्रामीण एक, नेवासे 12, पारनेर चार, राहुरी तीन, संगमनेर दोन, शेवगाव तीन, श्रीरामपूरमध्ये दोन रुग्ण आहेत. 

खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत 110 बाधित आढळले. त्यात महापालिका हद्दीत 38, अकोले पाच, जामखेड तीन, कोपरगाव एक, नगर ग्रामीण 14, नेवासे तीन, पारनेर सहा, पाथर्डी पाच, राहाता 12, राहुरी सात, संगमनेर दहा, शेवगाव तीन, श्रीगोंदे एक व श्रीरामपूरमधील एक रुग्ण आहे. 

अँटीजेन चाचणीत 182 बाधित आढळले. त्यात महापालिका हद्दीत 12, अकोले 22, जामखेड 11, कर्जत 15, पारनरे पाच, कोपरगाव सहा, नगर ग्रामीण चार, नेवासे दहा, पाथर्डी 16, राहाता 13, राहुरी दोन, संगमनेर 21, शेवगाव 23, श्रीगोंदे नऊ, श्रीरामपूरमधील 13 रुग्णांचा समावेश आहे. 

दरम्यान, जिल्ह्यातील 475 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यात महापालिका हद्दीत 106, अकोले 24, जामखेड 20, कर्जत 22, कोपरगाव 12, नगर ग्रामीण 31, नेवासे 22, पारनेर 14, पाथर्डी 68, राहाता 31, राहुरी 18, संगमनेर 50, शेवगाव 11, श्रीगोंदे 16, श्रीरामपूर 24, कॅन्टोन्मेंट तीन व मिलिटरी हॉस्पिटलमधील तिघांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 475 patients overcome corona in Nagar district