जुन्या इमारतीचे उजळणार भाग्य! 

दौलत झावरे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शिवराज पाटील यांनी परिसराची पाहणी करीत असताना जुन्या इमारतीतील अडगळीचे सुस्थितीतील साहित्य पाहिले. माहिती घेतली असता, या इमारतीची उभारणी 24 मार्च 1933 रोजी झाली असून, ती बडोदा संस्थानाचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी लोकल बोर्डाला स्वखर्चातून बांधून दिल्याचे त्यांना समजले.

नगर : कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या निधीत कपात झाल्याने अनेक कामे ठप्प झाली आहेत. जिल्हा परिषदेला निधी मिळावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच सर्वांना सुखद धक्का सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिला असून, या ऐतिहासिक वास्तूच्या दुरुस्तीसाठी तब्बल 48 लाखांचा निधी मंजूर केला आहे. 

अवश्य वाचा ः  अधिकारी अन् कर्मचारीच फिरतात फाईल घेऊन..

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शिवराज पाटील यांनी परिसराची पाहणी करीत असताना जुन्या इमारतीतील अडगळीचे सुस्थितीतील साहित्य पाहिले. माहिती घेतली असता, या इमारतीची उभारणी 24 मार्च 1933 रोजी झाली असून, ती बडोदा संस्थानाचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी लोकल बोर्डाला स्वखर्चातून बांधून दिल्याचे त्यांना समजले.

हेही वाचा ः मुलीच हुश्‍शार! 

या ऐतिहासिक वास्तूला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निश्‍चय त्यांनी केला. या संदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्याशी चर्चा करून, इमारतीच्या दुरुस्ती खर्चाचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना दिली.

क्लिक करा ः आय लव्ह माय जॉब..! 

त्यानंतर गावडे यांनी तातडीने इमारतीच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या 48 लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविला. 

दरम्यान, हा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यातच राज्य शासनाने सर्वच विभागांच्या निधीत कपात करण्याचे धोरण अवलंबिले. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूसाठी आता निधी मिळणार नाही, असेच सर्वांनाच वाटत होते. मात्र, गावडे यांनी सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाठपुरावा सुरूच ठेवल्यामुळे इमारतीच्या दुरुस्तीसाठी 48 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. 

ही कामे होणार 
जुन्या इमारतीचे छत काही ठिकाणी गळत असल्यामुळे वॉटरप्रूफिंग, स्वच्छतागृहासह पाण्याची पाइपलाइन, इलेक्‍ट्रिक फिटिंग, काही ठिकाणचे प्लॅस्टर, रंगकाम आदी. 

सामाजिक अंतर राखण्यास मदत 
जुन्या इमारतीची दुरुस्ती झाल्यानंतर त्यामध्ये नवीन इमारतीतील काही विभाग हलविण्यात येणार आहेत. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात कर्मचाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर राखण्यास मदत होणार आहे. 

जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे जुन्या इमारतीच्या कामासाठी 48 लाखांचा निधी मंजूर करून आणता आला. या दुरुस्तीमुळे जिल्हा परिषदेच्या वैभवात भर पडणार आहे. 
- दत्तात्रय गावडे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 48 lakh sanctioned for repair of historical structures