
शिर्डी : डोक्यावर पाच किलो वजनाची गाठ घेऊन वावरणाऱ्या अनिकेत इंगळे या विदर्भातील तरूणाच्या डोक्यावरील भार साईसंस्थान रूग्णालयातील डॉ. अजिंक्य पानगव्हाणे यांना कायमचा उतरवला. भुलतज्ञ डॉ. निहार जोशी यांच्या सहकार्याने यशस्वी शस्त्रक्रीया करून पानगव्हाणे यांनी तरूणाची त्रासातून कायमची सुटका केली. हि आगळी वेगळी शस्त्रक्रीया साईसंस्थान रूग्णालयात चर्चेचा विषय ठरली.