
राहाता : निळवंडे प्रकल्पाच्या उर्वरित कामांकरिता केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीने ५ हजार २३ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली. त्यामुळे केंद्र सरकारकडून या निळवंडे प्रकल्पास निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही आनंदाची बातमी आहे. निळवंडे कालव्यांसह वितरिकांची कामे आता वेगाने पूर्ण होतील, अशी माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.