esakal | शेवगावात औरंगाबाद-नगरचे ५५ जुगारी अटकेत, थेट नाशिकच्या पथकाने मारली रेड
sakal

बोलून बातमी शोधा

55 gamblers arrested in Aurangabad and Nagar in Shevgaon

शेवगाव शहराच्या वर्दळीच्या व मध्यवर्ती भागात सुरु असलेल्या या जुगार अड्डयात महाराष्ट्रातील इतर जिल्हयासह थेट परराज्यातूनही ग्राहकांची ये-जा सुरु होती. त्यात अनेक प्रतिष्ठीत व उच्चभू व्यक्तींचाही समावेश आहे.

शेवगावात औरंगाबाद-नगरचे ५५ जुगारी अटकेत, थेट नाशिकच्या पथकाने मारली रेड

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव : शहरातील वर्दळीच्या नेवासे रस्त्यावरील स्टेट बँकेसमोरच्या गोडाऊन मध्ये पत्याचा झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळतांना तब्बल 55 जणांना अटक करुन त्यांच्याकडून सुमारे 35 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर यांनी नेमलेल्या पथकाने काल बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. विशेष म्हणजे शेवगाव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरु असलेल्या या जुगार अड्डयावर थेट नाशिक येथील पथकाने कारवाई केल्यामुळे शेवगाव पोलीसांच्या कार्यक्षमतेचे पितळ उघडे पडले आहे. 

पो.काँ. उमाकांत लक्ष्मण खापरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रतापराव दिघावकर विशेष पोलीस महानिरीक्षेक नाशिक यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी नेमलेल्या पथकाने काल बुधवार ता.9 रोजी रात्री 11 च्या सुमारास शेवगाव शहरातील नेवासे रस्त्यावरील स्टेट बँकेसमोरील फिरोज इनामदार यांच्या मालकीच्या पत्र्याच्या बंद गोडाऊनमध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगार सुरु होता.

हेही वाचा - दया तोड दो दरवाजा... पोलिसांनी भिंगारला केली सिनेमा स्टाईल कारवाई

त्यामध्ये देविचंद बेलाजी वराडे ( रा,धामणगाव ता. आष्टी) उमेश मुलजोभाई कोटक ( रा. राजकोट राज्य गुजरात) गणेश भानुदास गाडे (रा. विदयानगर शेवगाव) गोवर्धन हरिदास मजीठीया (रा.मिरा रोड मुंबई), मुनाफ रफिक शेख ( रा.नाईकवाडी मुहल्ला शेवगाव) राजू भिमराव निकाळजे, ( रा. हाकेगाव ता. शेवगाव) रफिक बहुदीन शेख ( रा.संजयनगर औरंगाबाद) आरुण माणिक राठोड ( रा. कळसपिंप्री ता. पाथर्डी), जाकीर बु-हान शेख ( रा. इंदिरा नगर शेवगाव), सुभाष संतोष तुपे - ( रा.बिडकीन ता. पैठण), स्वप्निल जनार्धन थोरात ( रा. नेवासा), अल्ताफ अब्बास शेख (रा. दिलजले वस्ती शेवगाव), हरिदास उर्फ हरिभाऊ विठ्ठल सुपारे -( खंडोबानगर शेवगाव), भागिनाथ विठोबा खर्चन (रा.आखेगाव ता. शेवगाव), हरकु निराळे भोसले (रा. शेवगाव), सखाराम सोनाजी कुसळकर -( वडारगल्ली शेवगाव), गणेश भिमा शिनगारे (रा. लोळेगाव ता. शेवगाव), चंद्रकांत रमेश वैरागर (रा.घोडेगाव ता. नेवासा), सुनिल सुरेश धोत्रे - (रा.वडारगल्ली शेवगाव), अंकुश रामराव लंभाटे (रा. घोटण, ता. शेवगाव), दत्तू विश्वनाथ होरशीळ (रा. भिमनगर औरंगाबाद), सय्यद शौकत सय्यद बशीर (रा. काँरपोरेशन औरंगाबाद), सचिन रमेश आदमाने (रा.कोर्टासमोर शेवगाव), नारायण बाळकृष्ण फुंदे (रा.ब्राम्हण गल्ली शेवगाव), श्रीकांत तुकाराम काळे (रा. कुकाणा ता. नेवासा), विष्णू साहेबराव लवघळे, गोरख सुदाम हिवाळे ( दोघे रा.भिवधानोरा ता. गंगापूर), बप्पासाहेब त्रिंबक विघ्ने (रा.कोर्टाच्या मागे शेवगाव), अर्जुन जनाबापू चौधरी (रा.धामनगाव ता.आष्टी), पंडीत शंकर कुसळकर (रा. वडार गल्ली शेवगाव), शिवनाथ रामभाऊ ढाकणे (रा.मुर्शदपूर ता. शेवगाव), राहुल विश्वास पंडीत (रा. घोडेगाव ता. नेवासा), नवनाथ गोरख खैरे, पांडूरंग कुंडलीक नवरंगे, कांतीलाल नामदेव सुखधान( तिघे रा. अगरवाडगाव ता. गंगापूर) , राजेश अंबादास राठोड (रा.सिध्दीविनायक काँलनी शेवगाव), अल्ताफ गयासौद्दीन इनामदार (रा. नेहरुनगर शेवगाव), राजू बाजीराव दिनकर, आबासाहेब शंकर काळोखे, राहुल राजू दिनकर, संजय सर्जेराव चितळे ( चौघे रा.पाथर्डी ), सऊद मसुद अहमद (रा. मकसुद काँलनी औरंगाबाद), जफर हुसेर करार हुसेन (रा.सिटी चौक, औरंगाबाद), शेख रियाज शेख मुसा (रा. रेणुकामाता मंदीराजवळ औरंगाबाद), जलाल सुन्ना शेख (रा. तिसगाव पाथर्डी), यावरखान लालखान पठाण (रा.जिन्सी औरंगाबाद), अरुण बन्सी कोलते (रा.बाभुळगाव ता. पाथर्डी), सचिन रामचंद्र कोकळे (रा.शेवगाव), योगेश जिजाभाऊ जाधव (रा. देवळाली नाशिक), अरबाज अल्ताफ इनामदार (रा. इंदिरानगर शेवगाव), अमित किशोर शिंदे (रा. धामणगाव ता. आष्टी), विवेक राधाकिसन घुले (रा.नेवासा), मिनिनाथ लक्ष्मण भवार (रा. कळसपिंप्री ता. पाथर्डी), जावेद सिराउद्दीन खान (रा. जयसिंगपूरा औरंगाबाद), अंबादास श्रीधर चितळे (रा. चितळेवाडी पाथर्डी), आदी 55 जणांना ताब्यात घेत त्या ठिकाणाहून 2 लाख 70 हजार 360 रुपयांची रोख रक्कम, 4 लाख 39 हजार रुपये किमतीच्या दुचाकी, 28 लाख रुपये किमतीच्या चारचाकी गाडया, 76 हजार 500 रुपये किमतीचे जुगाराचे साहीत्य असा एकुण 35 लाख 85 हजार 860 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या सर्वांविरुध्द शेवगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदया अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई नाशिकच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस उपनिरीक्षक, संदीप पाटील, राजेंद्र सोनवणे, पो. काँ.नितीन सकपाळ, उमाकांत खापरे,विश्वेश हजारे, चेतन पाटील, अमोल भामरे, नारायण लोहरे, सुरेश टोंगारे आदींनी ही कारवाई केली आहे.

परराज्यातील जुगाऱ्यांचा राबता

शेवगाव शहराच्या वर्दळीच्या व मध्यवर्ती भागात सुरु असलेल्या या जुगार अड्डयात महाराष्ट्रातील इतर जिल्हयासह थेट परराज्यातूनही ग्राहकांची ये-जा सुरु होती. त्यात अनेक प्रतिष्ठीत व उच्चभू व्यक्तींचाही समावेश आहे. छाप्यात सापडलेल्या व्यक्तींची संख्या व लाखोंचा मुद्देमाल यावरुन या अड्डयाची व्याप्ती लक्षात येते. शेवगाव पोलीसांना साधी खबरबातही नसलेल्या या अड्डयावर थेट नाशिकच्या पथकाने छापा टाकल्याने तो नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.