अजबच की! श्रीगोंद्यात दोन सेकंदात व्हायचा ६० मिलिमीटर पाऊस

60 mm of rain in two seconds in Shrigonda
60 mm of rain in two seconds in Shrigonda
Updated on

श्रीगोंदे : देवदैठण येथे सलग 5 दिवस (28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर ) या कालावधीत दररोज पाऊस होत होता. पर्जन्यमापकात तशी नोंद झाली. या पावसामुळे महसूल विभाग पुरता चक्रावून गेला होता.

या पावसावर संशयाचे धुके आले होते. त्या महसूल मंडळाचे हवामान यंत्र निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. स्थानिक पातळीवर जाऊन चौकशी करण्यात आली. या चौकशीत भलताच प्रकार समोर आला.

वास्तविक 2 सेकंदात इतका पाऊस झाला तर प्रचंड नुकसान झाले असते. एवढा पाऊस झाल्यास ती अतिवृष्टी गणली जाते. यामुळे या बाबतीत तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे प्रत्यक्ष पंचनामा, जबाब घेऊन चौकशी करण्यात आली.

संबंधित 5 दिवस तेवढा पाऊस झालाच नव्हता. पर्जन्यमापक यंत्रामध्ये पाणी टाकून अज्ञात व्यक्तीने दिशाभूल केली होती. तसे निष्पन्न झाले. 
त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरूद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात सार्वजनिक मालमत्तेच्या संपत्तीमध्ये छेडछाड केल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

राज्य शासनाद्वारे हवामान विषयक माहिती रेकॉर्ड करण्यासाठी प्रत्येक महसूल मंडळात, स्कायमेट या कंपनीशी करार करुन बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर स्वयंचलित हवामान यंत्र बसविण्यात आले आहेत. सदरील यंत्राद्वारे हवामानाच्या 5 घटकांच्या नोंदी दर 10 मिनिटांनी नोंदवुन ऑनलाईन उपलब्ध होतात . पीक विमा, दुष्काळ, कालव्यामधील आवर्तन व धरणातील विसर्ग यांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेताना या नोंदी ग्राह्य धरल्या जातात. या मुळे संबंधित यंत्राशी छेडछाड करणे हा गुन्हा ठरतो.
- पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com