महिला प्रसुतीसाठी आरोग्य केंद्रात येताच नर्स बाथरूममध्ये लपली, दवंडी देऊनही निघेना बाहेर

As soon as the tribal women came to the health center for delivery, the staff hid in the bathroom
As soon as the tribal women came to the health center for delivery, the staff hid in the bathroom

अकोले : आदिवासी भागात आरोग्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. तालुक्यातील वारंघुशी या गावात एका गरोदर महिलेसोबत जे घडलं ते अंगावर काटा आणणारं होतं.
तालुक्यातील कळसुबाई शिखराजवळील वारंघुशी नावाचं गाव आहे. तेथील आरोग्य केंद्रात एक महिला बाळंतकळा सुरू झाल्याने प्रसूतीसाठी आली होती. मंजाबाई निरंकार लोटे असे त्या महिलेचे नाव. त्यावेळी तेथे परिचारिका होती. मात्र, बाळंतपणासाठी कोणीतरी महिला आल्याचे पाहून संबंधित परिचारिका गायब झाली. कोणीच कर्मचारी उपस्थित नसल्याचे सांगण्यात आलं. तोपर्यंत मंजाबाई च्या वेदना प्रचंड वाढत चालल्या होत्या.

गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत दोनवेळा दवंडी दिली. ती ऐकूनही आरोग्य कर्मचारी उपस्थित झाले नाहीत. शेवटी गावातीलच प्रसुतीचा अनुभव असणा-या महिलेला बोलावून या महिलेची प्रसुती करावी लागली.

घटनेची माहिती गावच्या सरपंच अनिता संजय कडाळी व माजी. उपसभापती भरत घाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आरोग्य कर्मचारी दवाखान्यातील बाथरुममध्ये लपून बसल्याचे निदर्शनास आले. त्या नर्सचे असे वर्तन त्या बाळंतीणीच्या जीवावर बेतले असते. 

गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

जोपर्यंत त्या नर्सचे निलंबन होणार नाही, तोपर्यंत या गावातील उपकेंद्राचे टाळे आम्ही उघडणार नसल्याचे सांगत गावक-यांनी उपकेंद्रास कुलुप लावले. आरोग्य उपकेंद्रास कुलूप लावण्यासाठी गावच्या सरपंच अनिता संजय कडाळी, पंचायत समिती सदस्या अलकाताई अवसरकर, उपसभापती भरत घाणे, सुनिता गोरख डगळे, भिमाबाई लोटे व भिमा लोटे यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.  

वारंघुशी हे गाव परीसरातील मोठे गाव अाहे. आमचे गाव शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात जोडण्याची मागणी गावच्या सरपंचांनी केली आहे.

पोटावर पाय देत केली होती प्रसूती

दोन वर्षांपूर्वी याच आरोग्य उपकेंद्रासमोर एका कातकरी महिलेची आरोग्य कर्मचारीअभावी पोटावर पाय देऊन प्रसुती केली गेली होती. त्यामुळे या गावातील आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

प्रकारात तथ्य आहे

वारंघुशी केंद्रातील प्रकाराबाबत तेथील सरपंचांचा मला फोन आला होता. त्यानुसार मी लाडगाव केंद्रातील डॉक्टरांना तिकडे पाठवले. मीही स्वतः तेथे गेलो होतो. त्यावेळी आरोपांमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित परिचारिकेच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.

डॉ. इंद्रजीत गंभीर, तालुका आरोग्य अधिकारी, अकोले


 
संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com