esakal | CORONA रूग्णसंख्या वाढल्याने श्रीरामपूरातील कारेगावसह बेलापुर खुर्द गावात कंटेनमेंट झोन
sakal

बोलून बातमी शोधा

Containment zone

श्रीरामपूर : CORONA रूग्णसंख्या वाढल्याने बेलापूर खुर्द 7 दिवस बंद

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील बेलापूर खुर्द परिसरात कोरोना (Corona) संसर्ग वाढल्याने पुढील सात दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक कोरोना समितीने घेतला आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग टप्याटप्याने वाढत आहे. तालुक्यातील कारेगाव परिसरात ३० तर बेलापुर खुर्द परिसरात १५ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे प्रशासनाकडुन दोन्ही गावात कंटेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आला आहे.

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

गुरुवारी दिवसभरात तालुक्यात २६ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या २०० हुन अधिक झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितली. मागील काही दिवसांत तालुक्यातील कोविड रुग्ण वाढल्याने नागरीकांनी विशेष काळजी घ्यावी, बेलापुर खूर्द परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने गाव बंद ठेवण्याचे, आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले होते. त्यामुळे स्थानिक कोरोना समितीने बेलापूर खुर्द गावातील प्रवेशद्वार तसेच गावात जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यावर बॅरिकेट्स लावले आहे. त्यामुळे गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने पुढील सात दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. व्यावसायिकांनी दुकाने खुले ठेवल्यास कोरोना वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

हेही वाचा: नुकसानग्रस्तांना राज्य सरकार दिलासा देणार : जयंत पाटील

संसर्गाची साखळी तोडण्यासाठी निर्णय

प्रारंभी व्यावसायिकांनी दुकाने खुली ठेवण्याची मागणी केली होती. मात्र संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने गाव बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला. बेलापुर खुर्द परिसरात सध्या १५ अ‍ॅक्टीव्ह कोरोनाबाधित रुग्ण असुन येत्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढु नयेत. म्हणुन गावातील गर्दीला रोख लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती उपसरपंच अ‍ॅड दिपक बारहाते यांनी दिली. ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाचा संर्सग वाढत असल्याने कोविड रँपीड अ‍ॅन्टिजन तपासणी (Rapid Antigen Test) वाढविण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे. तसेच अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असलेल्या परिसरात विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. देविदास चोखर यांनी सांगितले.

हेही वाचा: मिरजगावातील थरार! बसस्थानकात रक्ताचा सडा; हादरले प्रवासी

loading image
go to top