esakal | मिरजगावातील थरार! बसस्थानकात रक्ताचा सडा; हादरले प्रवासी
sakal

बोलून बातमी शोधा

bus stand

मिरजगावातील थरार! बसस्थानकात रक्ताचा सडा; हादरले प्रवासी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मिरजगाव (जि.अहमदनगर) : नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकात प्रवाशांना असा काहीसा धक्का बसेल याची कोणालाच कल्पना नव्हती. हा नेमका काय प्रकार आहे, याचा अंदाज कोणालाही येत नव्हता...काय घडले?

हे रक्त नेमके कशाचे? काय प्रकार आहे हा?

मिरजगाव येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकात प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या बाकांवर व फरशीवर मोठ्या प्रमाणावर सांडलेले रक्त आणि भिंतींवरील रक्ताचे डाग पाहून काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बसस्थानकात पडलेले रक्त पाहून ग्रामपंचायत सदस्य सागर पवळ यांच्याशी संपर्क करण्यात आला. पवळ यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. सर्वत्र रक्त सांडलेले त्यांच्या निदर्शनास आले. भिंतींवरही माणसांच्या हाताचे ठसे दिसून आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क केला. घटनास्थळी पोचल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण बसस्थानकाची पाहणी केली. त्यांना आसपास कोणतेही हत्यार किंवा अन्य वस्तू आढळली नाही. मारहाणीच्या कोणत्याही प्रकारची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल नाही. त्यामुळे हे रक्त नेमके कशाचे आहे, हे स्पष्ट झाले नाही.

हेही वाचा: UPSC : पोलीस अधिकाऱ्याचे मार्गदर्शन; 1000 विद्यार्थ्यांचे यश!

सीसीटीव्हीची मागणी

रक्ताने माखलेले फरशीवरील पायाचे ठसे आणि भिंतींवरील हाताचे ठसे पाहून, हा नेमका काय प्रकार आहे, याचा अंदाज येत नाही. अशा घटना रोखण्यासाठी बसस्थानकात सीसीटीव्हीची व्यवस्था करावी. - सागर पवळ, ग्रामपंचायत सदस्य

हेही वाचा: Jayant Patil : ‘सीना’चे फेरसर्वेक्षण करणार

loading image
go to top