नगर जिल्ह्यात पुन्हा भिती वाढली; आज तब्बल "एवढ्या' रुग्णांची वाढ 

दौलत झावरे 
Saturday, 25 July 2020

जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना बाधीतांची संख्या फक्त 11 निघाल्याने सर्वांना दिलासा मिळाला. मात्र शनिवारी सव्वाबारा वाजता अहवाल आल्याने पुन्हा भिती वाढली असून तब्बल 70 जणांचे कोरोना बाधीतांचे अहवाल आलेले आहेत.

नगर : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना बाधीतांची संख्या फक्त 11 निघाल्याने सर्वांना दिलासा मिळाला. मात्र शनिवारी सव्वाबारा वाजता अहवाल आल्याने पुन्हा भिती वाढली असून तब्बल 70 जणांचे कोरोना बाधीतांचे अहवाल आलेले आहेत. यामध्ये संगमनेर शहरात सर्वाधिक 12 रुग्ण आढळून आलेले असून त्याखालोखाल नगर शहरासह राहात्यात 11 व भिंगारमधील 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्‍लिक करा 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र रुग्ण सापडत असून त्याचे नियोजन करण्यात प्रशासन व्यस्त झालेले आहे. शुक्रवारी दोन टप्प्यात कोरोना तपासणीचे अहवाल आले. त्यात फक्त 17 जण कोरोना बाधीत आढळून आल्याने कोरोनाचा जिल्ह्यातील प्रादुर्भाव कमी झाल्याचे सर्वांनाच वाटू लागले होते. मात्र आज (शनिवारी) सव्वाबारा वाजता जिल्हा रुग्णालयाकडून अहवाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये तब्बल 17 जण कोरोना बाधीत आढळून आलेले आहेत. यामध्ये संगमनेरमध्ये बारा, पारनेरमध्ये पाच, नेवाशात दोन, राहात्यात 11 राहुरीत सात, राहुरीत सात, कोपरगावमध्ये तीन, नगर ग्रामीणमध्ये तीन, नगर शहरात अकरा, पाथर्डीत एक, शेवगावमध्ये एक, भिंगारमध्ये दहा, कर्जतमध्ये दोन, अकोले एख नांदेड येथून आलेला एक असे एकूण 70 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. 
जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या 2858 एव्हढी झालेली असून 1327 जण सध्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. 1480 जण बरे झालेले असून 51 जणांचा आजअखेर मृत्यू झालेला असल्याची नोंद झालेली आहे. 

सर्वांनाच सुखद धक्का 
जिल्ह्यातील 44 जणांनी कोरोनावर मात केलेली असल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेले आहेत. यामध्ये अकोलेतील एक, कर्जतमधील एक, नगर ग्रामीणमधील दोन, नगर शहरातील अकरा, पारनेरमधील दोन, पाथर्डीतील एक, संगमनेरमधील 10, श्रीरामपूरमधील दोन, राहात्यातील सात व श्रीगोंद्यातील सात जणांचा समावेश आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70 corona positive in Ahmednagar district on Saturday