esakal | धडकी भरेल पण हे सत्य आहे, नगरमध्ये पंधरवड्यात ७२१ मृत्यू

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे मृत्यू
धडकी भरेल पण हे सत्य आहे, नगरमध्ये पंधरवड्यात ७२१ मृत्यू!
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर बेड व रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनअभावी शहरातील आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली आहे. नालेगाव अमरधाममध्ये मागील तीन दिवसांत 195, तर 15 दिवसांत 721 कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काल दिवसभरात 65 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले. ही धडकी भरवणारी आणि अंजन घालणारी माहिती आहे.

योग्य उपचार मिळाले नाही म्हणून वा लोकांचा हलगर्जीपणा. कारण काहीही असो ही सत्य स्थिती आहे. आणि ती धडकी भवणारी आहे. आता तरी लोकांनी संसर्ग होऊ असे वर्तन करायला हवं.

शहरात सध्या ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर बेड व रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची कमतरता आहे. त्यामुळे बेड, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन वेळेत न मिळाल्याने रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. नगर शहरात नालेगाव, नागापूर, केडगाव व रेल्वेस्टेशन जवळील अमरधाममध्ये मृत कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्काराची व्यवस्था केली आहे.

आज नालेगाव अमरधाममध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक जास्त संख्येने आल्याने अमरधामचे दरवाजे बंद करण्यात आले होते. तसेच पोलिस बंदोबस्तही मागविण्यात आला होता. गेली तीन दिवसांपासून दररोज नालेगाव अमरधाममध्ये 65 कोरोना बाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार होत आहेत.

15 दिवसांत 721 अंत्यसंस्कार

ता. 8 पासून 22 एप्रिलपर्यंत अनुक्रमे एका दिवसात करण्यात आलेले अंत्यसंस्कार 42, 49, 18, 17, 43, 41, 42, 50, 57, 55, 55, 57, 65, 65 व 65.