नगर बाजार समितीत 80 कोटींचा गैरव्यवहार; प्रशासक नेमण्याची मागणी

दत्ता इंगळे 
Saturday, 3 October 2020

दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ताधाऱ्यांनी सात- आठ वर्षांत 80 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यहवार केला आहे. सहायक उपनिबंधकांच्या चौकशी समितीच्या अहवालात या बाबी स्पष्ट नमूद केल्या आहेत. त्यानंतरही सत्ताधारी मंडळाचा भ्रष्टाचार सुरूच आहे.

नगर : दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ताधाऱ्यांनी सात- आठ वर्षांत 80 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यहवार केला आहे. सहायक उपनिबंधकांच्या चौकशी समितीच्या अहवालात या बाबी स्पष्ट नमूद केल्या आहेत. त्यानंतरही सत्ताधारी मंडळाचा भ्रष्टाचार सुरूच आहे.

याबाबतच्या तक्रारीवरील उपनिबंधक गणेश पुरी समितीने अहवाल तातडीने द्यावा. नगर बाजार समितीवर प्रशासक नेमावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी पत्रकार परिषदेत केली. 

नगर तालुका महाविकास आघाडीने बाजार समितीच्या गैरव्यवहाराबाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस पंचायत समिती उपसभापती रवींद्र भापकर, रामदास भोर, गोविंद मोकाटे, प्रवीण कोकाटे आदी उपस्थित होते. 

हराळ म्हणाले, ""आमच्या तक्रार अर्जावर सहायक उपनिबंधक एस. डी. सूर्यवंशी यांच्या समितीने पाहणी करून अहवाल सादर केला. त्यात बाजार समितीमध्ये कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी, अनेक ठिकाणी अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम, याबाबत स्पष्ट ताशेरे ओढले आहेत. भाजप सरकारच्या काळात कोणतीही कारवाई झाली नाही.

महापालिकेच्या परवानगीशिवाय अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम तातडीने पाडण्याचे आदेश असूनही नगर महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आताही राजरोसपणे भ्रष्टाचार सुरू आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू आहे. त्यात बाजार समितीमध्ये कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी, अनेक ठिकाणी अनधिकृत गाळे बांधकाम, याबाबत स्पष्ट ताशेरे ओढण्यात आले आहेत.'' 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 80 crore fraud in Ahmednagar Agricultural Produce Market Committee