गिर्यारोहकांची दमछाक करणारा अलंगगड आला ऐंशी वर्षांच्या आजोबांना शरण!

शांताराम काळे
Thursday, 21 January 2021

धिंदळे यांचा चालण्याचा वेग 25-30 वर्षांच्या तरुणांना लाजवेल असा होता. त्यामुळे वाटेत त्यांना भेटलेल्या पर्यटकांनी "आजोबां'ची प्रशंसा केली. 

अकोले : पट्टीच्या गिर्यारोहकांचीही दमछाक करणाऱ्या, सह्याद्री डोंगररांगांतील अलंग गड ऐंशी वर्षांच्या आजोबांना शरण आला आहे. पट्टीचे गिर्यारोहकांनाही याचे आश्चर्य वाटते आहे.

देवराम नारायण धिंदळे (वय 80) यांनी हा गड केवळ दोन तासांत सर केला. गिर्यारोहणाचे प्रशिक्षण न घेता धिंदळे यांनी नातवासोबत घाटघर ते अलंगगड हे अंतर अवघ्या दोन तासांत पायी पार केले. 

त्या वेळी धिंदळे यांचा चालण्याचा वेग 25-30 वर्षांच्या तरुणांना लाजवेल असा होता. त्यामुळे वाटेत त्यांना भेटलेल्या पर्यटकांनी "आजोबां'ची प्रशंसा केली. 

हेही वाचा - सुंदर मुलीचं स्थळ चालून आलंय काय

धिंदळे म्हणाले, ""मी लहानपणापासून डोंगरदऱ्यांत जनावरे वळण्याचे काम करतो. त्यामुळे जंगल आणि कातळांसोबत माझे घनिष्ठ संबंध आहेत. मी अनेक डोंगर पालथे घातले आहेत. आज माझे वय 80 असले, तरी जुने दिवस विसरू शकत नाही. मी उभ्या कातळावर चढून औषधी वनस्पती आणि मधाचे पोळे काढायचो. त्यामुळे अलंगगडाची चढण शक्‍य झाली. मी पुन्हा एकदा गडावर येईन.'' अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The 80-year-old grandfather climbed Alanggad