अरे बाप रे अंबड जंगलात आग लागून ८०० झाडांची हानी

शांताराम काळे
Wednesday, 2 December 2020

कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे अंबड गावातील वनसंपदा सुरक्षित नाही.

अकोले (अहमदनगर) : कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे अंबड गावातील वनसंपदा सुरक्षित नाही. यासारखे दुर्दैव कोणतेच असू शकत नाही तरी अशा बेजबादार लोकांना याचे शासन झालेच पाहिजे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

अकोले महाविद्यालय व एनएसएस विद्यार्थ्यांनी अंबड गाव दत्तक घेऊन अंबड ग्रामपंचायत व अकोले महाविद्यालयाचे वतीने गाव तीन वर्षे दत्तक घेणार म्हणून घेण्यात आलेल्या शिबिरात गावात झालेल्या निर्णयानुसार खोकडमाळी डोंगरावर 800 सिताफळ झाडे लावून संपुर्ण गाव वर्गणीमुक्त होईल. या उद्देशाने अतिशय दुरदृष्टी निर्णय घेवून ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी मह्त्वाचे पाऊल उचलून जवळपास 36000 रुपये ड्रिपला खर्च करून विद्यार्थ्यांमार्फत वृक्षारोपण केले.

आज अख्ख्या गावाला कुणाची नजर लागावी अशी निंदनीय घटना घडली व सर्व मनसुब्यांवर पाणी फिरले परंतू याला सर्वस्वी वनविभागाचा मुजोर कर्मचारी जबाबदार आहे. खुप वेळा मी व सदस्य यांनी त्यांना जाळपट्टे घेण्याची विनंती केली होती. पण पेट्रोल द्या माणसं लागतील असे बहाणे करून संबधित कर्मचार्यांने वेळ काढून घेतली. म्हणून हा वाईट प्रसंग संपुर्ण गावावर आला. यामध्ये आर्थिक नुकसान तर झालेच पण पर्यावरण व सरकारच्या निर्णयाची राख रांगोळी केली. असल्याचे स्थानिक ग्रामस्थ व तरुणाचे मत बनले आहे.

याबाबत वनविभाग यांच्याशी संपर्क केला असता वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती पोले यांनी हा विषय सामाजिक वनीकरण यांचा आहे. तर सामाजिक वनीकरण विभागच श्रीमती गाडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र ८०० झाडे नष्ट झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. सरपंच डी. डी. जाधव यांनीही या घटनेस दुजोरा देऊन चौकशीची मागणी केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 800 trees set on fire in Ambad in Akole taluka