
नऊपैकी दोन जागा बिनविरोध झाल्याने, उर्वरित सात जागांसाठी आज शांततेत मतदान झाले.
राळेगण सिद्धी : ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी येथे काल 83 टक्के मतदान झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.
आमदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नातून राळेगणसिद्धीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी सरपंच जयसिंग मापारी व माजी उपसरपंच लाभेश औटी यांचे गट एकत्र आले होते. मात्र, काही अपक्षांनी उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही.
नऊपैकी दोन जागा बिनविरोध झाल्याने, उर्वरित सात जागांसाठी आज शांततेत मतदान झाले.
हजारे म्हणाले, ""मतदानाचा हक्क मूलभूत व सर्वश्रेष्ठ आहे. सुदृढ व निकोप लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी मतदान केले पाहिजे. उमेदवार पसंत नसेल, तर "नोटा'चे बटन दाबा; पण मतदान केले पाहिजे.'' दरम्यान, पानोली, पिंपळनेर, नारायण गव्हाण, वडुले येथेही शांततेत मतदान झाले.