

Ahilyanagar Battles Illegal Liquor Menace as Authorities Intensify Enforcement Drive
sakal
अहिल्यानगर: जिल्हाभर गावठी दारूचे अड्डे राजरोसपणे सुरू असल्याचे पोलिसांनी गेल्या २१ दिवसांत केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पुणे येथे विषारी दारूमुळे १८ जणांना जीव गमवावा लागला. यानिमित्ताने दहा वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पांगरमल येथे घडलेल्या घटनेची चर्चा रंगली. या घटनेनंतरही जिल्ह्यातील गावठी दारू अड्डे बंद झालेले नाहीत. उलट पोलिसांच्या साक्षीने राजरोसपणे हे दारू अड्डे सुरू असल्याचे चित्र आहे.