पारनेरमधील १३१पैकी ९८ गावे बाधित, २८जणांचा गेला बळी

मार्तंड बुुचुडे
Friday, 11 September 2020

ऑगस्टनंतर मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. त्याचे कारण अाता तालुक्यात रॅपीड टेस्ट केल्या जात आहेत. त्यामुळे ही संख्या वाढलेली दिसत आहे. कदाचित तालुक्यात ती या पुर्वीही असणार आहे मात्र त्या वेळी रॅपीड टेस्ट केल्या जात नसत.

पारनेर ः तालुक्यात गेली सुमारे पाच महिन्यात 19 मार्च ते 10 सप्टेंबरअखेर तालुक्यातील 131 पैकी 98 गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. या 98 गावांत अात्तापर्यंत 1048 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्या पैकी 806 रूग्णांनी कोरोनावर मात केली. ते सुखरूप घरी परतले आहेत. दुर्देवाने या आजाराने 28 जणांना मृत्यू झाला आहे. सध्या 186 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

ऑगस्टनंतर मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. त्याचे कारण अाता तालुक्यात रॅपीड टेस्ट केल्या जात आहेत. त्यामुळे ही संख्या वाढलेली दिसत आहे. कदाचित तालुक्यात ती या पुर्वीही असणार आहे मात्र त्या वेळी रॅपीड टेस्ट केल्या जात नसत.

हेही वाचा - श्रीगोंद्याचं पाणी लय घाण

सध्या मात्र आरोग्य विभागाकडे रॅपीड टेस्टसाठी किट कमी असल्याने तपासणीत अाढथळा येत आहे. अनेक संशयित रूग्ण तपासणीसाठी जातात. मात्र, त्यांना तासनतास तिष्टत बसावे लागते. किंवा किट शिल्लक नसल्याने तपासणीशिवाय तसेच पाठीमागे यावे लागते. त्यामुळे संशयित रूग्ण हताश झाले आहे.

तालुक्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.02 टक्के असून कोरोना रूग्णांचा मृत्यू दर फक्त 2.74 टक्के आहे. तो अतीशय कमी आहे ही समाधानाची बाब आहे. तसेच तालुक्यात 65.88 टक्के पुरूष तर महिला रूग्णांची संख्या 34.12 टक्के आहे. तसेच 80 वर्षावरील व 20 वर्षांतील रूग्णांची संख्या त्या मानाने कमी आहे. सर्वाधिक कोरोना रूग्ण संख्या 41 ते 80 वयोगटातील मध्यमवयीन व वृद्धांची दिसून येत आहे.

कोरोना रूग्णांची तपासणी
एकूण तपासणी-6600
घशातील स्त्राव- 3299
रॅपीड टेस्ट-3301
कोरोना पॉझिटिव्ह दर-15.45 

 

या वयोगटातील लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
तालुक्यातील रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कारण ज्या ठिकाणी कोरोना बाधीत रूग्ण सापडतात तेथे व त्यांच्या संपर्कातील लोकांच्या रॅपीड टेस्ट केल्या जातात. त्यामुळे ही संख्या वाढत आहे. तसेच लोक फारशी काळजी घेत नाहीत सोशल डिस्टन्स मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. लोकांनी स्वताःची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे

-ज्योती देवरे,तहसीलदार.

संपादन - अशोक निंबाळकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 98 out of 131 villages in Parner affected