नगर जिल्ह्यात श्रीगोंद्याचं पाणी लय घाण

Shrigonda water is most polluted in Nagar district
Shrigonda water is most polluted in Nagar district

नगर ः जिल्ह्यातील 14 तालुक्‍यांत ऑगस्टमध्ये पाण्याचे 1354 नमुने तपासण्यात आले. त्यांत 85 गावांतील 116 नमुने दूषित आढळून आले. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाणीनमुने तपासले जातात. पाणी दूषित आढळल्यास संबंधित ग्रामपंचायतींना सूचना केल्या जातात. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दरमहा तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या वाढत आहे.

ऑगस्टमध्ये तपासलेल्या 1354पैकी 85 नमुने दूषित आढळले. या महिन्यात दूषित पाण्याची टक्केवारी 8.57वर गेली आहे. श्रीगोंदे तालुक्‍यात 20 गावांतील पाण्याचे 22 नमुने दूषित आढळले. त्याखालोखाल राहुरीतील 10 गावांतील पाण्याचे 19 नमुने दूषित आढळून आले.

एक एप्रिल ते 31 ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील 7403 नमुने तपासण्यात आले. त्यांत 410 दूषित आढळून आले. जिल्ह्याची टक्केवारी 5.44 आहे. जामखेड तालुक्‍यातील 27 नमुने तपासले असून, त्यांत एकही नमुना दूषित आढळला नाही. 

दूषित पाणीपुरवठा होणारी गावे 
नगर ः बुऱ्हाणनगर, कापूरवाडी, वारूळवाडी, नागरदेवळे, मेहेकरी, सोनेवाडी, भातोडी, पारगाव, पारेवाडी, खांडके, बारदरी, पिंपळगाव लांडगा, कामरगाव, अकोळनेर. अकोले ः मुथाळणे, समशेरपूर, सावरगाव पाट, टाकळी, खानापूर, आगर. कर्जत ः लोणी मसदपूर, बहिरोबावाडी, पाथरवाडी, धांडेवाडी. कोपरगाव ः मळेगाव थडी, माहेगाव देशमुख, आपेगाव. नेवासे ः निपाणी निमगाव, कारेगाव. पारनेर ः अळकुटी, भाळवणी, दैठणे गुंजाळ, धोत्रे खुर्द व बुद्रुक, गोरेगाव, गारगुंडी, सुपे. पाथर्डी ः माणिकदौंडी, मुंगसेवाडी, चितळी, येळी, तिनखडी, हत्राळ. शेवगाव ः रांजणगाव खुर्द, पिंप्री लौकी, नपावाडी. राहुरी ः उंबरे, धामोरी खुर्द व बुद्रुक, बाभूळगाव, चेडगाव, वळण, सडे, पिंप्री अवघड, मल्हारवाडी. संगमनेर ः पारेगाव खुर्द, नान्नज दुमाला, वडगावपान, मळेगाव हवेली. श्रीगोंदे ः मांडवगण, घोगरगाव, तरडगव्हाण, दुलेगाव, वेळू, हिरडगाव, आढळगाव, निंबवी, कोरेगव्हाण, राजापूर, बेलवंडी, म्हसे, वडगाव, येळपणे, पोलिसवाडी, उक्कडगाव, कौठे. श्रीरामपूर ः लाडगाव. 

तालुकानिहाय नमुने (कंसात दूषित नमुने) 
नगर ः 143 (18), अकोले 180 (10), कर्जत 26 (पाच), कोपरगाव 90 (तीन), नेवासे 48 (दोन), पारनेर 89 (18), पाथर्डी 113 (सहा), शेवगाव 81 (चार), राहाता ः 66 (तीन), राहुरी 138 (19), संगमनेर 135 (चार), श्रीगोंदे 152 (22), श्रीरामपूर 66 (दोन). 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com