कोरोनावर डॉक्टरनेच सांगितला दारूच्या काढ्याचा उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daru 1234.jpg

सोशल मीडियावर एक क्लीप व्हायरल झाली असून त्यामध्ये देशी दारुचा काढा कोरोना बाधितांना दिल्यास रुग्ण बरा होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कोरोनावर दारूच्या काढ्याचा उपाय! डॉक्टरला नोटीस

शेवगाव (अहमदनगर) : कोरोनाच्या (Corona) संसर्गामुळे सर्वजण त्रस्त असताना व बाधित रुग्णांना वैद्यकीय सुविधा आणि बेड मिळणे कठीण बनले असताना बोधेगाव (bodhegaon) येथील एका डॉक्टराने (Doctor) कोरोनावरील उपचारासाठी देशी दारूच्या मद्योपचार थेरेपीचा (alcohol therapy) दावा केला आहे. देशी दारुच्या सहाय्याने 50 हून अधिक कोरोनाबाधीत रुग्ण बरे केल्याचा दाव्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र याबाबत प्रशासनाने पडताळणी करून कोरोना उपचाराबाबत रुग्ण व नातेवाईकांची चलबिचल थांबवावी, अशी मागणी होत आहे. (A doctor in bodhegaon has claimed the use of indigenous alcohol therapy for the treatment of corona)

कोरोना लाटेच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बोधेगाव येथील डॉ. अरुण भिसे यांच्या नावाने सोमवारी (ता.१०) सोशल मीडियावर एक क्लीप व्हायरल झाली असून त्यामध्ये देशी दारुचा काढा कोरोना बाधितांना दिल्यास रुग्ण बरा होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत पृष्टीसाठी त्यांनी काही रुग्णांना या उपचार पध्दतीने आलेला अनुभव कथन करण्यात आला आहे. याचबरोबर दारुची मात्रा कशी उपयुक्त ठरते हे समजून सांगण्यासाठी काही संशोधनाचा दाखलाही देण्यात आला आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे अहमदनगर शहरात कडकडीत नि"र्बंद", कापडबाजारात शुकशुकाट

ही पोस्ट सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून त्यावर मतमतांतरे व्यक्त करण्यात येऊ लागली आहेत. एकीकडे बाधित रुग्ण व नातेवाईक उपचारासाठी धडपड करत असताना या पोस्टमधील दाव्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. प्रशासनाने याबाबतची पडताळणी करण्याची गरज असून त्यामुळे कोरोना संसर्गाच्या वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत नागरिकांची चलबिचल थांबविण्याची गरज आहे.

या गंभीर परिस्थितीत चर्चेत येण्यासाठी आपण दारुचे समर्थन करत नाही. मात्र आजपर्यंत बेड न मिळालेल्या ५० कोरोनाबाधीत रुग्णांना दारुपासून बनवलेल्या काढ्याच्या आधारे बरे केले आहे. आजही काही रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात माझ्या आतापर्यंतच्या वैद्यकीय अनुभवानुसार सत्यता आढळून आली असून पुराव्यानिशी ते सिध्द करु शकतो.

- डॉ. अरुण भिसे, बोधेगाव

संबंधित डॉक्टरांना वैद्यकीय अधिक्षकांमार्फत नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना तहसील कार्यालयात चौकशीसाठी बोलावून सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टबाबत त्यांच्याकडून शहानिशा करुन कारवाई करण्यात येईल.

- अर्चना भाकड, तहसिलदार, शेवगाव

सोशल मीडियावरील त्या पोस्टबद्दल माहिती मिळताच खात्री करण्यासाठी बोधेगाव येथे डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी ती मात्रा दिल्यावर रुग्णांना फरक पडल्याचे सांगितले. मात्र अशा पोस्ट व्हायरल करुन रुग्णांची दिशाभूल करून नागरिकांमध्ये संभ्रम पसरु नका, असे स्पष्टपणे सांगितले आहे. याबाबत संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक निर्णय घेतील.

- डॉ. सलमा हिराणी, तालुका आरोग्य अधिकारी, शेवगाव

हेही वाचा: 40 वर्षांच्या अविरत मेहनतीनंतर भाजप सत्तास्थानी; अहमदनगर जिल्ह्यात पक्षाची खडतर वाटचाल

कोरोनावरील उपचाराचा असा दावा करणाऱ्या डॉ. भिसे यांचे बोधेगाव येथे सिताई नावाचे खाजगी हॉस्पिटल असून विशेष म्हणजे त्यांच्याकडे बोधेगाव येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयाच्या अधिक्षक पदाचा कार्यभार आहे. त्यामुळे याबाबत जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर शहानिशा करण्याची गरज आहे.

कोरोना विषाणूवरील लिपीड आवरण नष्ट करण्यासाठी आयुर्विज्ञान संस्थेने मंजुरी दिलेल्या औषधांच्या आणि अल्कोहोलच्या केमिकल फार्म्युल्यात खुपच साधर्म्य आहे. शिवाय कोरोना विरुध्दच्या वैदयकीय लढाईत स्टेरॉईड, रेमडिसीवर, ऑक्सिजन, हेपारीन व मल्टीविटामिनचा वापर सुरू आहे. मात्र त्यामुळे १०० टक्के रुग्ण बरे होत नाहीत. रूग्णास परिस्थितीनुसार ३० मिली अल्कोहोलचा काढा ७ ते १० दिवस दिल्यास फरक पडतो. मात्र गरोदर महिला व लिव्हरचा त्रास असणाऱ्या रुग्णांना काढ्याऐवजी अल्कोबॉट उपकरणाच्या आधारे अल्कोहोलची वाफ देण्यात यावी, असा दावा डॉ.भिसे यांनी केला आहे.

(A doctor in bodhegaon has claimed the use of indigenous alcohol therapy for the treatment of corona)

Web Title: A Doctor In Bodhegaon Has Claimed The Use Of Indigenous Alcohol Therapy For The Treatment Of

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ahmednagarbodhegaon
go to top