
संगमनेर : मांडवे बुद्रुक (ता. संगमनेर) येथे असलेल्या चाँद शहावली दर्ग्यावरील घुमटाचे बांधकाम सुरू आहे. काम सुरू असताना बुधवारी दुपारी या घुमटाचा काही भाग कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर संगमनेरशहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.