वावर है तो पावर है! काष्टीचा शेतकरी महिन्याला कमावतो २ लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हशीचा गोठा

वावर है तो पावर है! काष्टीचा शेतकरी महिन्याला कमावतो २ लाख

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : कष्टासोबत आधुनिकता आणि अचूक नियोजनाची जोड दिल्यास दूध धंद्यातून दरमहा लखपती होता येते, हे काष्टी येथील ज्ञानदेव पाचपुते यांनी दाखवून दिले आहे. दूधधंद्याची वाट लागलेली असताना हा शेतकरी लाखोंनी कमावतो आहे. (A farmer from Kashti earns Rs. 2 lakh per month from milk business)

पाचपुते हे काष्टी येथील साईसेवा पतसंस्थेचे चेअरमन आहेत. या दूध धंद्यात त्यांची पत्नी जयश्री व मुलगा रोहित यांची मदत होते. दूध धंद्यात आता परवडत नाही, असे म्हणाऱ्यांनी पाचपुते यांचा हा गोठा पाहायला हवा. एक म्हैस विकत घेतली आणि दूध धंदा आवडीखातर सुरु केला, असे पाचपुते सांगतात.

तो वाढत गेला आणि आज पन्नास दुभत्या म्हशी, त्यांच्या तीस रेड्या झाल्या. रेड्यांसाठी मुक्त गोठा केला आहे. दूध धंदाही आता नियोजनबध्द आणि आधुनिक पध्दतीने केला तरच परवडतो. शेतकऱ्यांनीही बदलले पाहिजे, असे मनाला पटवित या धंद्यात उडी घेतली आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या आमदाराला पवारांनी ब्रीच कँडीत हलवलं

म्हशींसाठी पाच ते सात मजूर ठेवले आहेत. इथे मजुरांची वाणवा असल्याने सगळे हरियाणा येथील आहेत. काष्टीतील पाण्यात क्षार जास्त असल्याने जनावारांना त्यापासून विकार होण्याचा धोका असल्याने म्हशींचे पिण्याचे पाणीही फिल्टरचे देतो. त्यासाठी फिल्टर प्रकल्प तेथेच केला आहे. तर त्यांची स्वच्छता, वीजेचा प्रश्न सोडविण्यासाठी गोठ्याच्या वरच्या बाजूला सोलर प्रकल्पही उभारला आहे. महिन्याचे खाद्य एकदाच घेतो, शिवाय पावसाळ्यात त्याचे वेगळे नियोजन केले जाते असेही ते म्हणाले.

सध्या बाजारात दूधाचा दर कितीही असला तरी आम्ही ताजे व क्वालिटीचे खात्रीशीर दूध रतीबाने देतो. 55 रुपये लिटर दूध देतो. मात्र ते ग्राहकाला समाधान देणारे असते त्यामुळे रोज निघणारे साधारण पाचशे लिटर दूध अशाच पध्दतीने विकतो. त्यासोबतच तूप, पनीर, दही याचेही थोड्या प्रमाणात निर्मिती करुन त्याची गावातच विक्री करतो.

शेणखताचे होतात १२ लाख

पाचपुते यांची या गोठ्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांची आजपर्यंत गुंतवणूक झाली आहे. दरमहा पाच लाखापर्यंत खर्च व त्यातून दोन लाखाचा निव्वळ नफा असे आर्थिक गणित पाचपुते यांनी सांगितले. शिवाय म्हशींच्या खताचे वर्षाला दहा ते बारा लाख रुपये मिळतात. हा नफा वर्षाच्या जमाखर्चात धरला जातो, असा दावाही त्यांनी केला. शेतीत योग्य नियोजन केलं आणि थोडं भांडवल गुंतवल्यास निश्चित फायदा होतो. मात्र, या सगळ्यासाठी पाणी महत्त्वाचं. (A farmer from Kashti earns Rs. 2 lakh per month from milk business)

loading image
go to top