कोरोनाबाधित राष्ट्रवादीच्या आमदाराला पवारांनी ब्रीच कँडीत हलवलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kiran lahmate1

आमदार लहामटे 16 मे रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. ते राजूर येथे निवास्थानी विलगीकरण राहून 3 दिवस घरीच उपचार घेत होते.

राष्ट्रवादीच्या आमदाराला पवारांनी ब्रीच कँडीत हलवलं

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांना मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदार हे संगमनेर येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉ. नितीन जठार हे त्यांच्यावर उपचार करीत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री यांच्याकडून लहामटे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. डॉ. लहामटे यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी अद्यापि ताप कायम असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे.(MLA Kiran Lahamate treated at Breach Candy Hospital)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री यांच्या आग्रहाखातर डॉ. लहामटे यांच्यावर पुढील उपचार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी त्यांना मुंबई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान आमदार लहामटे 16 मे रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. ते राजूर येथे निवास्थानी विलगीकरण राहून 3 दिवस घरीच उपचार घेत होते. ताप काही कमी होत नसल्याने संगमनेर येथे चैतन्य हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुंबई येथे नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. कार्यकर्त्यांनी कोणतीही काळजी करू नये, असे आवाहन करण्यात आलं आहे.(MLA Kiran Lahamate treated at Breach Candy Hospital)

loading image
go to top