esakal | पारनेरमधील 112 वस्त्यांसाठी साडेपाच कोटींचा निधी
sakal

बोलून बातमी शोधा

पारनेरमधील 112 वस्त्यांसाठी साडेपाच कोटींचा निधी

पारनेरमधील 112 वस्त्यांसाठी साडेपाच कोटींचा निधी

sakal_logo
By
मार्चंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : तालुक्यांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास कार्यक्रमअंतर्गत वस्तीचा विकास करणे (दलित वस्ती सुधार योजने) अंतर्गत 112 वस्त्यांसाठी (112 settlements) एकूण 127 कामे मंजूर झाली आहेत. त्यासाठी सुमारे पाच कोटी ४५ लाख ५६ हजार रुपयांचा निधी (fund of Rs 45 lakh) मंजूर झाला असल्याची माहिती पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी दिली. (A fund of Rs 45 lakh has been sanctioned for 112 settlements in Parner)

तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत विविध कामांचे प्रस्ताव जिल्हापरिषदेकडे पाठविण्यात आले होते. संबंधित प्रस्ताव सन 2020-21 मधील असून त्याकामांचा जिल्हापरिषद पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून तालुक्यातील 112 वस्त्यांसाठी 127 कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. या कामांसाठी सुमारे पाच कोटी 45 लाख 56 हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे, असेही शेळके म्हणाले.

हेही वाचा: जिल्हाधिकाऱ्यांच्या अचानक भेटीची खबर लिक, तहसीलदार प्रगटल्याने चांगलेच सुनावले

गत वर्षी अनेक गावातील दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत कामे होऊ शकली नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणचा निधी परत सरकारला पाठवावा लागला होता. परंतु या वर्षासाठीचा मोठा निधी वैयक्तिक लक्ष घालून आणला आहे. त्याचे संपूर्ण काम त्या गावांमध्ये झाले पाहिजे, यासाठी मी स्वत: लक्ष घालणार आहे व कोणत्याही स्थितीत तो निधी परत मागे जाता कामा नये, याची दखल घेतली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. प्रत्येक गावाने आलेला हा निधी लवकरात लवकर खर्च करून आपली कामे पूर्ण करावीत, असे आव्हानही सभापती शेळके यांनी केले आहे.

(A fund of Rs 45 lakh has been sanctioned for 112 settlements in Parner)