esakal | विष पिऊनही मृत्यू न आल्याने तीने आयसीयूमध्ये घेतला गळफास
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्या

विष पिऊनही मृत्यू न आल्याने तीने आयसीयूमध्ये घेतला गळफास

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी : गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. किरकोळ कारणांवरूनही ते त्यांचा अहंकार दुखावतो. भावनांचे व्यवस्थापन न करता आल्याने ते थेट मृत्यूला कवटाळत आहेत. राहुरी तालुक्यात अशीच एक घटना घडली.

सतरा वर्षांची अल्पवयीन मुलगी.‌ पाच दिवसांपूर्वी तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. विषारी औषध प्राशन केले. घरच्यांनी तात्काळ दवाखान्यात हलविले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू झाले. तिचे प्राण वाचले. परंतु, आत्महत्येचा विचार डोक्यातून गेला नाही. काल गुरुवारी (ता. २४) सायंकाळी साडेसात वाजता तिने रुग्णालयात गळफास घेतला. अखेर तिच्या आयुष्याची दोरी तुटली. (A minor girl committed suicide in ICU at Rahuri)

हेही वाचा: हटके ः एकरात कमावतो १५ लाख, फक्त फोन घ्यायला चार कर्मचारी!

पायल सुभाष मुसमाडे (वय १७, रा. देवळाली प्रवरा) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी : जातप शिवारात शेतातील वस्तीवर मुसमाडे कुटुंब राहते. तिच्या वडिलांचे चार-पाच वर्षांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले आहे. घरात तिची आई, आजी व दोन लहान बहिणी असा परिवार आहे. आई शेतमजुरी करून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. आई बरोबर तिचा किरकोळ कारणाने वाद झाला. रागाच्या भरात तिने रविवारी (ता. २०) विषारी औषध प्राशन केले.

राहुरी फॅक्टरी येथे श्री विवेकानंद नर्सिंग होममध्ये तिला उपचारासाठी हलविण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू झाले. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. परंतु, आत्महत्येच्या विचारात सुधारणा झाली नाही.

काल गुरुवारी (ता. २४) सायंकाळी साडेसात वाजता रुग्णालयातील परिचारिकांची नजर चुकून तिने अतिदक्षता विभागातील पार्टिशनच्या नळीला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यातच तिची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल दिनेश आव्हाड करीत आहेत.

(A minor girl committed suicide in ICU at Rahuri)

loading image
go to top