वाढीव वीजबिलाविरोधात "आप"चे चड्डी-बनियान आंदोलन

गौरव साळुंके
Sunday, 17 January 2021

कोरोनामुळे सर्वच क्षेत्राची आर्थिक घडी विस्कटली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लॉकडाउन लागू केल्याने आर्थिक चक्र थांबले. परिणामी, दळणवळण व्यवस्था विस्कळित झाली.

श्रीरामपूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये आलेल्या वाढीव वीजबिल माफ करण्याची मागणी शेतकरी, छोटे व्यावसायिक, संघटित आणि असंघटित मजुरांनी केली. त्यासाठी अनेक आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या येथील पदाधिकाऱ्यांनी थेट चड्डी-बनियन घालून आगळेवेगळे आंदोलन केले. 

कोरोनामुळे सर्वच क्षेत्राची आर्थिक घडी विस्कटली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लॉकडाउन लागू केल्याने आर्थिक चक्र थांबले. परिणामी, दळणवळण व्यवस्था विस्कळित झाली.

सर्वसामान्य नागरिक आर्थिक कोंडीत सापडला आहे. सरकारने कोरोना संकटातील वीजबिल माफ करावे, यासाठी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली शहरात नुकतेच चड्डी-बनियन घालून, हातात फलक घेत महावितरण कार्यालयासमोर आगळेवेगळे आंदोलन केले.

आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, सचिव राहुल रणपिसे, शहराध्यक्ष किशोर वाडिले, अक्षय कुमावत, यशवंत जेठे या वेळी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aam Aadmi Party's agitation against increased electricity bill