पदवी प्रमाणपत्रासाठी मागितली लाच; प्राचार्यासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात

Bribe
BribeBribe
Updated on

श्रीरामपूर (जि. नगर) : मुलीचे बीएचएमएस पदवीचे प्रमाणपत्र व इंटरशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी एक लाख ४७ हजार ५०० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी तालुक्यातील वडाळा महादेव येथील एका होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यासह महिला लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) आज (गुरुवारी) रंगेहाथ पकडले.

प्रभारी प्राचार्य बापूसाहेब हरिश्चंद्रे (वय ५२, रा. मानूर, ता. राहुरी) व लिपिक भारती इथापे (वय ३४, रा. निपाणी वाडगाव) असे अरोपींची नावे आहेत. येथील शहर पोलिस ठाण्यात आज सायंकाळी लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती एसीबीचे पोलिस निरीक्षक श्याम पवरे यांनी दिली. तक्रारदाराच्या मुलीचे बीएचएमएस पदवीचे पासिंग सर्टिफिकेट व इंटर्नशिप पूर्ण केलेल्या कालावधीच्या हजेरीची तडजोड करुन प्रमाणपत्र देण्यासाठी आरोपीने लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाच्या नाशिक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार पथकाने सापळा रचला.

Bribe
नाशिक विमानतळ येणार हज टर्मिनलच्या यादीत

दरम्यान, कुठलेही शासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा खाजगी व्यक्तीने कोणतेही शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ ०२४१- २४२३६७७ तसेच टोल फ्री १०६४ क्रमांकवर संपर्क करण्याचे, आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक दिपक करांडे, हवादार संतोष शिंदे, नाईक रमेश चौधरी, अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला अंमलदार संध्या म्हस्के, हवालदार हारुन शेख, नाईक राहुल डोळसे यांच्या पथकाने सापळा रचुन केली. मिळालेल्या तक्रारीनुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचुन आरोपी एकच्या सांगण्यावरुन आरोपी दोन लाच स्विकारताना रंगेहात पकडले. याबाबत झोडेगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील ४९ वर्षीय एका व्यक्तीने मंगळवारी (ता. १०) तक्रार केली होती.

Bribe
वैशाली झनकरांची संपत्ती लाखोंच्या घरात; जमीन, फ्लॅटसह गाड्यांचा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Police Tighten Noose Around Gender Testing Racket; More Arrests Likely After Fresh Seizure
Allegations Over Evaluation Process Prompt Fresh Review of Panchayats Across State
Pune Doctor Among Latest Arrests in Widening Illegal Foetal Sex Determination Network
Shepherd Loses Life in Massive Explosion After Handling Unexploded Bomb
Marathi News Esakal
www.esakal.com