आजारी चुलत्यांना रस्त्याकडेला बसवून तो धावला अपघातग्रस्तांच्या मदतीला

विनायक दरंदले
Saturday, 9 January 2021

सोनई येथील युवक अपघातात जखमी झालेल्या चुलत्यांना घेऊन रूग्णालयात निघाला होता. प्रवासात त्याला अपघात झाल्याचे दिसले. तो पुढे न जाता तिथेच थांबला.

सोनई (जि.अहमदनगर) ः आपण प्रवास करीत असताना वाटेत अपघात घडला असेल तर हळहळतो आणि पुढे निघून जातो. नको ती झंझट, उगाच वेळ वाया जाईल, असं कारण आपल्याकडे तयार असतात. परंतु सर्वच लोक असा विचार नाही करीत. सोनईतील युवकाने जपलेल्या बांधिलकीमुळे त्याचे कौतुक होतंय.

सोनई येथील युवक अपघातात जखमी झालेल्या चुलत्यांना घेऊन रूग्णालयात निघाला होता. प्रवासात त्याला अपघात झाल्याचे दिसले. तो पुढे न जाता तिथेच थांबला.

हेही वाचा - मंत्री गडाखाचा प्रचारात विकासाचा नारा

सामाजिक कार्यकर्ते सुभाष राख यांचा मुलगा अभिजीत आपले चुलते अशोक राख यांना नगर येथील रुग्णालयात मोटारसायकलवर घेवून चालले होते.नगर-औरंगाबाद रस्त्यावरील शिंगवे तुकाई हद्दीत पोचताच त्यांना वीज उपकेंद्रासमोर बस आणि  मालवाहतूक ट्रकचा अपघात दिसला. बसमधील जखमींना मदतीची गरज लक्षात घेवून त्यांनी जखमी चुलत्यांना रस्त्याकडेला बसवून बसमधील जखमींना मदत केली.

सर्वप्रथम शनैश्वर देवस्थान व  १०८ रुग्णवाहिका व पोलिस ठाण्यास संपर्क केला. नंतर उपस्थितांच्या मदतीने बसमधील सात जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पोच केले. त्यानंतर चुलत्यांना रूग्णालयात नेलं.

या युवकाचे ग्रामस्थ व प्रवाशांनी कौतुक केले. बसचालक विजय ठोमणे यांच्या फिर्यादीवरुन सोनई पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
           ----------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accident happened while taking the sick cousins ​​to the hospital