
अहिल्यानगर : अपघातग्रस्त ट्रकवर डल्ला टाकून त्यामधील टायर व साहित्य (तांबे) चोरी करणाऱ्या वांबोरी (ता. राहुरी) येथील टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे.