
पारनेर: पारनेर साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी (ता. १८) कारखान्यातील साहित्याचा पंचनामा केला. न्यायालयाच्या आदेशानुसार हा पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी सर्व साहित्याची पाहणी करून पंचनामा केला असला, तरी कारखान्यातील साहित्य जागेवर आहे किंवा नाही, याबाबत पोलिसांनी कोणतीच माहिती दिली नाही. दरम्यान, कारखान्यातील सुमारे दीडशे कोटी रुपयांचे साहित्य चोरीला गेले असल्याचा आरोप पारनेर कारखाना बचाव कृती समितीच्या सदस्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.